शेअर बाजारात घसरण सुरूच   

मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी बुधवारी पुन्हा घसरला. सेन्सेक्स २३९ ने घसरून तो ८१ हजार ३१२.१२ वर  तर निफ्टी ७३,७५ ने घसरून २४ हजार ७५२.४५ वर बंद झाला. सेन्सेक्स दिवसभरात एका क्षणी ३०७.६१ ने घसरून ८१ हजार २४४ पर्यंत घसरला होता. ब्रिटिश मल्टिमीडिया कंपनीने अडीच टक्के गुंतवणूक (१२ हजार ९२७ कोटी रुपये) काढून घेतल्याने आयटीसीचे समभाग ३ टक्क्यांनी घसरले. इंडसईंड बँक, नेसले, अल्ट्रा टेक सीमेंट, महिंद्रा अँड महिंद्रा, पॉवर ग्रीड, एशियन पेंट्स, सन फार्मा व टेक महिंद्रा यांच्या समभागाचे मूल्य घसरले. या उलट बजाज फायनान्स, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, अदानी पोर्टस आणि एचसीएल टेक यांच्या समभागाचे मूल्य वाढले.आशियात दक्षिण कोरिया, जपान, शांघाय आणि हाँगकाँग शेअर बाजार घसरले होते. युरोपमध्येही अशीच परिस्थिती होती. अमेरिकेतील नॅसडॅक मंगळवारी सुमारे अडीच टक्केत उसळला होता. डाऊजोन्समध्ये सरासरी पावणे दोन टक्के वाढ झाली. 

Related Articles